माजी नगरसेविका स्व. मुग्धा लोंढे यांच्या स्मृतीदिनानिमीत्त बुधवारी रक्तदान शिबिर
पनवेल(प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमीत्त बुधवार दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर ह्यांच्या हस्ते तसेच भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपास्थितीत सकाळी ९.०० वाजता होणार आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन युवानाद पनवेल, कच्छ युवक संघ पनवेल, कन्या आरोग्य मंदिर पनवेल आणि लोंढे व ओझे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.