महिला मंडळातर्फे विविध ठिकाणी भजनाचा कार्यक्रम..
पनवेल वैभव / दि.१२ (संजय कदम): पनवेलमध्ये गेल्या १० वर्षांपासून विविध ठिकाणी भजनाचे कार्यक्रम सादर करून तेथे मिळणारे उत्पन्न किंवा मानधन हे गो शाळेला वाटप करणाऱ्या माताजी ग्रुप पनवेल महिला मंडळाचा यंदाचे १० वे वर्ष असून त्यांनी यावेळी सुद्ध नवरात्री हिंदु सार्वजनिक महोत्सव मंडळ पनवेल व दुर्गा माता मंदिर पनवेल येथे भजन सादर केले आहे.
सदर महिला मंडळ हे श्रावणातसुद्धा विविध ठिकाणी भजने व धार्मिक कार्यक्रम सादर करीत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने मंजुला कलोर, मधु परमार, जशोदा कुमावत, नीमा वैष्णव, नीलम वैष्णव, मंजुला चुडावत, मंजु सुखवाल, सिता कुमावत या सादर करीत असतात. व यांना मिळणारे उत्पन्न सामाजिक कार्यासह गरजवंत आणि गो शाळेला देत असल्याने त्यांचे पनवेलमध्ये कौतुक होत आहे.
फोटोः महिला मंडळ