सोहळा सख्यांचा कार्यक्रमात नवदुर्गांचा सन्मान..
पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
दिशा कल्चरल इव्हेंट्स प्रस्तुत दिशा महिला मंच व आर के ग्रुप आयोजित नवदुर्गा पुरस्कार व sun मराठी प्रस्तुत सोहळा सख्यांचा कार्यक्रम शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी बेलेझ्झा बँक्वेट हॉल खांदा कॉलनी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सिनेकलाकार आशिष पवार व आर के ग्रुप चे राजेंद्र कोलकर सर उपस्थित होते. यावेळी समाजात काम करणाऱ्या सौ. करुणा ईश्वर ढोरे, डॉ.श्वेता गजभिये भालेराव, समाजसेविका शांती झा, पत्रकार दिपाली पारसकर, डॉ शिल्पा भंडारवार, गौरी पाटील, डॉ.विशालाक्षी कानगुले, आशा प्रवीण पाटील, वर्षा पाचभाई या नवदुर्गाना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सिनेकलाकार आशिष पवार यांनी सख्यांचे मनोरंजनाचे खेळ घेऊन सोहळा सख्यांचा मोठ्या आनंदात साजरा केला. यावेळी ओरोस्माईल डेंटल क्लीनिक चे डॉ शिल्पा भंडारवार व अमित भंडारवार यांचे विशेष सहकार्य मिळाले. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळून देण्यासाठी नेहमीच मदत करणाऱ्या राजेंद्र कोलकर सरांनी उपक्रमाचे कौतुक करत दिशा व्यासपीठास शुभेच्छा दिल्या तसेच sun मराठी चॅनल वर सुरू होणाऱ्या सोहळा सख्यांचा या कार्यक्रमाचे देखील कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी दिशा व्यासपिठाच्या निलम आंधळे, विद्या मोहिते, खुशी सावर्डेकर व इतर अनेक मान्यवर व सख्या उपस्थित होत्या.