शिवसेना उरण विधानसभेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट योजना अभियानाला जोरदार सुरुवात..
 कुटुंब भेट योजना अभियानाला जोरदार सुरुवात..
पनवेल वैभव / वार्ताहर : -
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली यात एका महिलेला दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत आणि ती महिला निर्भय आणि आर्थिक स्वावलंबी होणार आहे. 
या योजनेला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळात आहे आणि बहिणींनी या योजनेचे जोरदार स्वागत केले आहे.  मात्र काही समाजकंटक आणि विरोधिपक्षातील नेते या बाबत राजकारण करतांना दिसत आहेत  यालाच प्रत्युत्तर म्हणून सन्मानीय मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या आदेशाने समस्त महाराष्ट्रातील शिवसैनिक आता याच योजनेचा लाभ घेतलेल्या बहिणीकडे त्यांच्या घरी कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात आहे या भेटीत त्या बहिणीला इतर अनेक योजनांची माहिती दिली जात आहे, योजनेबाबत विरोधकांनी पसरविलेले गैरसमज दूर केले जात असून घरातील वयोवृद्धांसाठी वयश्री योजना सांगून त्याचे फॉर्म भरले जात आहेत, घरातील युवती जी कॉलेज ला शिकत आहे तिचे सरकार मार्फत मोफत शिक्षण होणार आहे या बाबत माहिती दिली जात आहे तसेच घरातील तरुण युवकाला स्वावलंबी बनविण्यासाठी सरकारची युवा प्रशिक्षण योजना सांगितली जात आहे, त्याच बरोबर सरकारच्या इतर योजना यांचा प्रसार व प्रचार केला जात आहे. एकूणच एका संपूर्ण कुटुंबाला योजनांच्या माध्यमातून स्वावलंबी कुटूंब बनविण्यासाठी ही लाडकी बहीण कुटुंबभेट योजना राबवली जात आहे, युवासेनेचे राज्य सचिव तथा हया योजनेचे कोकण समन्वयक, उरण विधानसभेचे निरीक्षक रुपेश पाटील यांच्या निरीक्षणाखाली ही मोहीम गावागावात राबविली जात आहे.
शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी, महिला उपजिल्हा प्रमुख वैजयंती ठाकूर या योजनेच्या उरण विधानसभेच्या अशासकीय सदस्या आहेत, विधानसभा संघटक मनोज घरत, सहसंपर्क प्रमुख रमेश म्हात्रे, तालुका प्रमुख महेंद्र पाटील, सोनल घरत, कृष्णा पाटील, अक्षय म्हात्रे व शिवसेना- महिला आघाडी- युवासेना पदाधिकारी प्रत्येक गावागावात जाऊन ही भेट घेत आहेत आणि आलेल्या समस्यांबाबत तहसील व बँक प्रशासना सोबत चर्चा ही करत आहेत. 
याबाबत सर्व अहवाल, लाभ मिळालेल्या बहिणींची आकडेवारी, समस्या या बाबतचा सगळा अहवाल हा वरिष्ठांना निरीक्षक रुपेश पाटील यांजकडून दिला जात आहे.
Comments