स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीची कामोठे येथील कार्यकर्त्यांसोबत बैठक संपन्न..
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीची कामोठे येथील कार्यकर्त्यांसोबत बैठक संपन्न..
पनवेल वैभव, दि.25 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी कामोठे वसाहतीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न केली .
 त्यावेळी पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव अशोक जाधव त्याचप्रमाणे सुनील दयानंद कुमार, अजित रवींद्र खेरवाल , श्यामलाल जीवनराज घारू व त्यांचे अनेक सहकारी उपस्थित होते.  स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पक्ष संघटना बांधण्यास जोरदार सुरुवात केलेली आहे.  कामोठे बरोबर त्यांनी खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी येथे आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे पसरवण्यास सुरुवात केलेली आहे.  त्यांच्या धडाडीच्या कार्यामुळे अनेक तरुण कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली तयार होत आहे व तरूण कार्यकर्त्यांची फळी निर्माण होत आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.


फोटो ः महेश साळुंखे बैठक
Comments