आमदारकी म्हणजे पक्ष अन संघटनेने व्यक्त केलेला विश्वासच : आमदार विक्रांत पाटील
पनवेल वैभव / (दीपक घोसाळकर):
विद्यार्थी परिषदेमध्ये असताना संघ संस्काराने परिपूर्ण झालो. पक्ष आणि संघटनेचे काम विद्यार्थीदशे पासूनच करत आलो . पक्षाने दिलेली सर्व जबाबदारी चोखपणे पार पडून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत रुजवण्यात यशस्वी झालो. पक्षाकडे कधीच काही मी मागितलं नाही .पण मी ध्येय निष्ठेने केलेल्या माझ्या कामाचे मूल्यमापन पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर करून मला विधान परिषदेवर आमदार म्हणून राज्यपाल नियुक्त केलं .हा पक्षाचा, संघटनेचा,अन माझ्या कामाचा एक प्रकारे सन्मानच आहे. विधान परिषदेमधील आमदारकी म्हणजे पक्ष आणि संघटनेने व्यक्त केलेला माझ्यावरचा विश्वासच असल्याचे मनोगत नवनियुक्त विधान परिषदेतील आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पनवेल येथे पत्रकारांशी दिलखुलास बोलताना व्यक्त केल.
महायुती शासनाकडून राज्यपाल नियुक्त करण्यात आलेले आमदार पनवेलचे सुपुत्र आणि भाजपाचे महासचिव विक्रांत बाळासाहेब पाटील यांची पनवेल मधील पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. यावेळी पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष विवेक पाटील ,सचिव मंदार दोंदे, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील ,पत्रकार दीपक घोसाळकर ,संजय कदम, राजेंद्र पाटील, राजीव गाडे ,प्रवीण मोहकर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी आमदार विक्रांत पाटील यांच्याशी दिलखुलास चर्चा केल्या. विद्यार्थी परिषदेतील कार्यकर्ता ते आमदारापर्यंतचा त्यांनी प्रवास थोडक्यात सांगून त्यांचा प्रवास हा राजकीय क्षेत्राला प्रेरणादायी अन अचंबित करणारा आहे .भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी परिषदेचे काम तळागाळापासून केल्यानंतर पक्षाने विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या ह्या त्यांच्यावर दिल्या होत्या. त्या जबाबदाऱ्या त्यांनी शिरसावंद मानून चांगल्या पद्धतीने पार पाडल्या. नंतर पक्षाने त्यांच्याकडे पक्षकार्याची जबाबदारी सोपवली.पक्षांने जे जे काही काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सुवर्णात आणि जनता भीमुख काम करण्यात त्यांनी आपली मोलाची कामगिरी बजावली. पक्ष अन संघटनेचे काम करीत असतानाच पनवेल नगरी मधूनही मोलाचे भरभरून प्रेम दिल्याने नगरसेवक उपमहापौर पद ही चांगल्या पद्धतीने स्वीकारून पनवेलकरांची सेवा ही करण्याचे भाग्य लाभले .पक्षाने राज्यस्तरीय असणारी महासचिव पदाची जबाबदारी खांद्यावर दिल्यानंतर जवळजवळ चार वर्षांमध्ये १८ लाख किलोमीटरचा राज्यभर प्रवास करून महाराष्ट्र व महाराष्ट्रातील पक्षाचे कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून पक्षाचे काम हे जवळून पाहिल्याचे विक्रांत पाटील यांनी यावेळी सांगितले. राज्यस्तरीय तसेच केंद्रीय स्तरावरच्या पक्षाच्या विविध समित्या मधून काम करण्याची संधी मला प्राप्त झाली.पक्षाचे काम करीत असताना पक्षाकडून काही मिळेल याची कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने काम करीत असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री व सद्यस्थितीतले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेबांसोबत काम करण्याची मोठी संधी मला मिळाली .त्यांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या मला दिल्या त्या पेलण्यातही मी यशस्वी झालो. राज्यपाल नियुक्त आमदारकी बाबतही चर्चा सुरू असताना मी कोणाकडेही गेलो नाही किंवा कोणालाही सांगितले नाही. पण अनेक वर्ष केलेल्या कामाचे परिश्रमाचे पक्षाने मूल्यमापन केले अन मला विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त केलं, हे मी केलेल्या पक्षाच्या कामाची एक पोचपावतीच असल्याची भावना यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. मला अजून भरपूर पक्षाचे काम हे राज्यभर फिरून तितक्याच तडफेने करायचे असल्याचा निर्धारे यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे