९५ मोटार सायकलचे गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार गजाआड..
९५ मोटार सायकलचे गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार गजाआड..

पनवेल, दि.23 (संजय कदम) ः  नवी मुंबईसह पनवेल परिसरात 95 च्या वर दुचाकी चोरीचे गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने गजाआड केले आहे.
पनवेल परिसरातून एक दुचाकी चोरीस गेली होती. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेचे कक्ष 2 पनवेलचे वपोनि उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक करीत असताना सदर आरोपी हा विक्रोळी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून नासिर सद्दाम खान (59) याला या पथकाने ताब्यात घेतले असता त्याच्याकडून पनवेल परिसरातून चोरी केलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. तसेच यापूर्वी त्याने अशाच प्रकारे कामोठे व परिसरातून मोटार सायकली चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.


फोटो ः आरोपी
Comments