खारघर मधील तरुणांचा शेकाप मध्ये जाहीर पक्ष प्रवेश..
खारघर मधील तरुणांचा शेकाप मध्ये जाहीर पक्ष प्रवेश.

 
पनवेल /प्रतिनिधी.
 महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना आणि महाविकास आघाडीला लोकांची पसंती वाढत चालल्यामुळे खारघर मधील अल्पसंख्याक समुदायाचे आसिफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली साकिब खान, रशीफ  खान, बिलाल मंसूरी, जावेद खान, आसिफ मुकादम, अब्दुल कलाम,अब्दुल सलाम आदींच्या बरोबरीने शेकडो मुस्लिम युवकांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल येथे झालेल्या एका कार्यक्रमात माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी कामगार पक्षात जाहीरपणे प्रवेश केला.
        हा पक्ष प्रवेश करण्यासाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य देवेंद्र मढवी, खारघर चे समाजसेवक बिलाल पटेल यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आसिफ खान यांनी सांगितले आमचे गेल्या दहा वर्षात खूप नुकसान झाले. याच कारणामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षात पक्षप्रवेश करत आहोत. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले आज आपण जो पक्ष प्रवेश केला आहे तो किती योग्य आहे हे थोड्याच दिवसात कळेल. आणि शेतकरी कामगार पक्षांमध्ये आपल्याला सन्मान जनक वागणूक मिळेल याची ग्वाही देतो . 
या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी पनवेल शहर जिल्हा चिटणीस  गणेश कडू, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य  देवा पाटील, देवेंद्र मढवी, बिलाल पटेल, रा गो  पाटील,  अजित अडसूळे, प्रतीक ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image