रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे दिवाळी ड्रायफ्रुट प्रोजेक्ट उपक्रम
पनवेल वैभव, दि.4 (संजय कदम) ः रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल हा पनवेलमधील सामाजिक कार्यासाठी नावाजलेला क्लब म्हणून ओळखला जातो. गेली 35 वर्षं आमचा क्लब डॉ गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल मधे अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे. या उपक्रमासाठी लागणारा निधी आमच्या क्लब च्या सभासंदांव्यतिरिक्त काही फंड रेझिंग प्रोजेक्ट च्या माध्यमातून समाजातूनही जमा केला जातो ज्याचा विनियोग स्वच्छ सुंदर सुरक्षित पनवेल या उपक्रमाअंतर्गत येणार्या प्रोजेक्ट साठी केला जातो. गेली 13 वर्षं दिवाळी ड्रायफ्रुट हा फंड रेझिंग प्रोजेक्ट आम्ही राबवतोय ज्यात आम्ही रोटेरियन आणि आमच्या नर्स स्वतः मेहेनत करून हे ड्रायफ्रुट बॉक्सेस निवडून खरेदी करतात. त्यात ड्रायफ्रुट भरून असे आकर्षक बॉक्सेस तयार करतात. हे बॉक्सेस अतिशय कमी प्रॉफीट मार्जिन ठेवून आम्ही विक्रीसाठी ठेवतो.
2024/25 या वर्षातील दिवाळी ड्रायफ्रुट प्रोजेक्टच्यसा शुभारंभासाठी पनवेल महानगरालिकेचे मा.सभागृह नेते रोटेरियन परेश ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून तसेच पनवेलचे प्रसिद्ध बिल्डर राजूशेठ गुप्ते आणि प्रसिद्ध शल्यचिकित्सक रोटेरियन डॉ गिरीश गुणे हे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून उपस्थित होते. रोटरी वर्ष 24/25 चे क्लबचे प्रेसिडेंट रोटेरियन शैलेश पोटे, सेक्रेटरी दीपक गडगे ,प्रोजेक्ट कॉर्डीनेटर आणि प्रेसिडेंट इलेक्ट रोटेरियन विवेक वेलणकर आणि इतर मान्यवर पास्ट प्रेसिडेंट्स , रोटेरियन आणि न्स यांच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम अतिशय दिमाखात संपन्न झाला.
फोटो ः रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल दिवाळी ड्रायफ्रुट प्रोजेक्ट उपक्रम