विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन ...
कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन ...
पनवेल (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याबरोबरच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यामुळे हा खोटा प्रचार हाणून पाडण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सतर्क रहावे, असे मार्गदर्शक आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येथे केले. सेक्टर प्रमुख व सेक्टर प्रभारी यांची बैठक तसेच राज्यपाल नियुक्त आमदार विक्रांत पाटील यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 
   या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, दीपक बेहेरे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक हरेश केणी, तालुका उपाध्यक्ष एस.के. नाईक, संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजेश पटेल, सुनील घरत, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कर्जत अध्यक्ष राजेश भगत, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा कमला देशेकर, अध्यक्षा राजेश्री वावेकर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील,  यांच्यासह माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सेक्टर प्रमुख व सेक्टर प्रभारी, पदाधिकारी उपस्थित होते. 
        लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे म्हंटले की, लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला लागण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या लढाई लढल्या आहेत. मोर्चे, आंदोलने, बैठका, पाठपुरावा केला आहे. त्या अनुषंगाने दिबांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आणि  दिबासाहेबांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचेही नावाचा प्रस्ताव केंद्राकडे आला नसल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केले आहे तसेच आमचे सरकार दिबांच्या संघर्षाचा आणि आपल्या संघर्षांचा सन्मान करीत असल्याचे त्यांनी सांगून लवकरच दिबांचे नाव विमानतळाला जाहीर करण्याचे आश्वासनही केंद्र सरकारच्यावतीने त्यांनी दिले आहे. असे स्पष्ट असतानाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला गेला. आणि त्या अनुषंगाने स्वर्गीय रतन टाटा यांचे नाव देण्याच्या वावड्या उठवण्यात आल्या. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक बाबतीत विरोधाभास निर्माण करून खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाईल, त्यांच्या भूलथापांना जनता भुलणार नाही मात्र आपणही त्यांचा अपप्रचार खोडून काढला पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले. पुढे बोलताना राज्यपाल नियुक्त आमदार विक्रांत पाटील यांचे कौतुक केले. विक्रांतच्या निमित्ताने आनंदाची बातमी मिळाली. तो आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण असल्याचे अधोरेखित करून संघटनात्मक जबाबदारी पार पाडताना मिळालेला सन्मान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. विक्रांत पाटील यांचा आचार संहिता असल्याने आज छोटेखानी सत्कार घेण्यात आला. पण निवडणूक संपल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील यांचा विजयी भव्य जाहीर सत्कार सोहळा आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
         दरम्यान या बैठकी दरम्यान भाजप पक्ष श्रेष्ठींकडून उमेदवारी जाहीर झाल्याचे वृत्त प्रसारित झाले आणि बैठकीत विजयी घोषणा देत जल्लोष करण्यात आला. उमेदवारी दिल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्ष नेतृत्वाचे तसेच पदाधिकारी कार्यकर्त्याचे व जनतेचे आभार मानले. भाजपच्या कार्यकर्त्याला संधी मिळते त्याचे उदाहरण आमदार विक्रांत पाटील असल्याचे त्यांनी म्हंटले. आपल्याला कधी काही मिळेल याची अपेक्षा कार्यकर्ता बाळगत नाही तर काम करत राहायचे हा भाजप कार्यकर्त्याचा पिंड आहे. बाळासाहेब पाटील यांनी गेली ४० वर्षे मेहनत आणि जिद्दीने काम केले, असे सांगतानाच विक्रांत पाटील यांनी केलेली मेहनत फळाला आली असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले. खारघर टोलमुक्ती करण्याच्या दृष्टिकोनातून आपण भाजपात सहभागी झालो. त्यावेळी देवेंद्रजी यांनी आम्हाला टोल मुक्तीचा शब्द दिला होता आणि तो शब्द त्यांनी पूर्ण करून दिला आणि त्या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा वाहनचालकांना झाला. त्यानंतर अनेक प्रकल्प, योजना, विकासकामे देवेंद्रजींच्या व महायुतीच्या नेतृत्वामुळे पनवेल क्षेत्रात आली. त्यामुळे यापुढीलही काळात विकासाचा महामेरू चालत राहील, असा विश्वासही आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनतेला दिला. 
यावेळी प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांनी म्हंटले कि, लोकनेते रामशेठ ठाकूर विरोधी पक्षात होते तेव्हा सुद्धा त्यांच्याप्रती कायम आम्हाला आदर होता. आणि तो आदर भाजपात अधिक वृद्धिंगत झाला. कर्णानंतर दानशूर म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत. तर आमदार प्रशांत ठाकूर संयमी आणि दिलेली वेळ पाळणारे, सामाजिक जाणीव असलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या पाठीशी सर्वांचे आशीर्वाद असून विजय निश्चित आहे फक्त भरघोस मतांनी जिंकायचे आहे. असेही त्यांनी अधोरेखित करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आमदार विक्रांत पाटील यांचा झालेला सत्कार राजकीय जीवनातील मोठी अचिव्हमेंट असल्याचेही सांगितले.  
यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी आपल्या जीवनातील राजकीय आढावा मांडला  लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी माझा सन्मान केला त्याबद्दल मी भारावून गेलो आहे. बाहेरचे लोकं कौतुक करतात पण जेव्हा घरच्या लोकांकडून कौतुकाची थाप मिळते तेव्हा तो आनंद वेगळाच असतो आणि तो आजच्या सत्काराने मला झाला असून हे माझ्यासाठी अभिमानाचे आहे त्यामुळे मी तुमच्या प्रेमातून कधीही उत्तराई होऊ शकत नाही. लोकनेते रामशेठ ठाकूर हे मार्गदर्शनाचे विद्यापीठ आहे. आपल्या सर्वांचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नामदार रवींद्र चव्हाण, चंद्रकांतदादा पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. विधायक कार्य, वेळ, पायाला भिंगरी लावून काम करणे अशा अनेक गोष्टी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. आपला नेता शंभर नंबरी आहे, विरोधक वातावरण दूषित करण्याचे काम करतील पण आपण सर्वानी सजग राहिले पाहिजे. या निवडणुकीत प्रत्येकाने मीच उमेदवार असे समजून काम करा. फक्त विजय नाही तर मतांचा लीड महत्वाचा आहे, असेही त्यांनी म्हंटले. 
         यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सांगितले कि, विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक मंडलात कार्यालय आहे,आणि त्या कार्यालयांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच विविध योजना लोकापर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाते, मात्र विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नसल्याने ते आता वेगवेगळ्या क्लुप्त्या करत खोटा प्रचार करत आहेत. तसेच लाडकी बहीण किंवा इतर योजना बंद करण्याच्या अफवाही उठवत आहेत. त्या अफवांनाही नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. 

कोट- 
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने पनवेल विधानसभा मतदार संघाची मला उमेदवारी घोषित केली आहे. त्याबद्दल मी पक्षाचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी आणि सर्व केंद्रीय नेतृत्व, राज्यातील आमचे नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीसजी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, नामदार रवींद्र चव्हाण साहेब, आणि सर्व पक्षाचे नेतृत्वाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. पक्षाच्या नेतृत्वाने उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मला खात्री आहे कि, सर्व कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबतीने या मतदार संघामध्ये आश्वासक निर्णायक असा विजय मिळवू. देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेला विकास महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची होणारी प्रगती अखंडपणे चालू रहावी यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून विजयी होण्यासाठी सुज्ञ मतदार जनता, सर्व कार्यकर्ते सहकारी हे प्रचंड मेहनत घेतील आणि त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये सर्वाना अभिमान वाटेल असा विजय आम्ही संपादित करू. 

 
 - महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल विधानसभा मतदार संघ
Comments