वेश्या व्यवसायावर गुन्हेशाखेची कारवाई
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः तळोजा फेज 2, साई आनंद बिल्डींग, प्लॉट नंबर 33, से 17, रूम नंबर 202 येथे चालणार्या वेश्या व्यवसायावर नवी मुंबई गुन्हेशाखेच्या पोलिसांनी छापा टाकून सदरठिकाणाहून एका बांगलादेशी पिडीत महिलांची सुटका केली असून वेश्या व्यवसाय चालविणार्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबई गुन्हेशाखा अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता एक महिला ही वेश्याव्यवसायाकरीता से 17, प्लॉट, नंबर 28, अली अपार्टमेंन्टच्या बाजुस असणार्या बिल्डींग मधील रूम नंबर 202 मध्ये बोलावुन घेवुन ग्राहकास वेश्यागमनासाठी महिला व मुली दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेत आहे. व यासाठी सदरची महिला दोन हजार रूपये स्विकारत असल्याची माहिती मिळाली होती. त्याबाबत सदर बातमीची वपोनि घोरपडे यांनी शहानिशा करून कारवाईबाबत वरिष्ठांचे आदेश प्राप्त केले. त्यानुसार बनावट ग्राहकास सदर मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगुन उपरोक्त रूममध्ये पाठवले दिले. त्यानंतर बनावट ग्राहकाने केलेल्या सांकेतीक इशार्यावरून पथकाने रात्रीच्या सदरठिकाणी छापा टाकला असता, त्या ठिकाणी एका महिलेस वेश्यागमनाकरीता ठेवल्याचे आढळुन आले. वेश्याव्यवसायाकरीता महिला पुरवणारी महिला आरोपी हसीना मुशरफ खान, (30 वर्ष), मुळ रा.बांगलादेश हिने बनावट ग्राहकास महिलेस दाखवुन वेश्यागमनाकरीता 1000/- रोख स्विकारले तसेच तिच्या ओळखीची महिला सालिया शफिक खान (39), रा. रूम नं.103, पहिला माळा, दिव्याशा हाईटस, से.नं.23, तळोजा फेज-2, मुळ रा. कलकत्ता हिच्या क्युआर कोड बनावट ग्राहकास दाखवुन त्यावर एक हजार रूपये ऑनलाईन पाठवण्यास सांगितले. नमुद दोन्ही वेश्या व्यवसायाकरीता महिला पुरवणार्या महिला यांनी आपसात संगनमत करून बांगलादेशी पिडीत महिलेस प्राप्त करून तिच्याकडुन वेश्याव्यवसाय करवून घेण्यासह आरोपी हसीना मुशरफ खान, ही राहत असलेल्या जागेचा वेश्यागमनाकरीता वापर केला. तसेच ती भारतात वास्तव्य करत असल्याबाबत काही वैध पुरावा अगर कागदपत्र आढळुन न आल्याने वेश्याव्यवसायाकरीता महिला पुरवणार्या दोन्ही महिला आरोपींविरूध्द तळोजा पोलीस ठाणे येथे बीएनएस कलम 143 (2 ), 3 (5) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 1956 कलम 3, 4, 5, भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम 3 (अ), 6(अ), सह विदेशी नागरीक अधिनियम कलम 14(अ), अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे तर पिडीत महिलेस सुरक्षेकरीता चेंबुर येथे नवजीवन सुधारगृहात, ठेवण्यात आले आहे.