शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्‍चित - उमेदवार लिना गरड
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्‍चित - उमेदवार लिना गरड

पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पनवेल विधानसभा 188 महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. व आज कर्जत येथील मेळाव्यात त्यांनी लिना गरड यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आशिर्वादामुळे माझा विजय निश्‍चित असल्याचे मत महाविकास आघाडीचे उमेदवार लिना गरड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले आहे.
आज पनवेल परिसरात मशालीला अनुकूल वातावरण असून मतदार मोठ्या प्रमाणात मशालीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आहेत, हे दिसून आले आहे. कमी कालावधीमध्ये केलेला प्रचाराचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सुद्धा केला आहे. आज मशाल हे चिन्ह घराघरामध्ये पोहोचले असून, पनवेलमधील अनेक समस्या सोडविण्यासाठी सत्तेमध्ये गेल्यावर पनवेलमध्ये लिना गरड याच सोडवू शकतात. याचा ठाम विश्‍वास मतदारांना आहे. मालमत्ता कराचा प्रश्‍न, दुहेरी कर, शास्ती, पनवेलमधील पाण्याचा प्रश्‍न, रस्त्यावर पडलेले खड्डे, अद्ययावत हॉस्पिटल नसणे, मैदान नसणे, गार्डन नसणे यासारख्या सुविधा देण्यास पनवेलचे आमदार असफल ठरले असल्याने यंदाच्या निवडणुकीत मतदार हे निश्‍चितपणे महायुतीच्या पाठीमागे उभे राहून मशाली समोरचे चिन्हाचे बटण दाबतील. बाळाराम पाटील यांना समज देवू सुद्धा ते आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो वापरत आहेत. तसेच अनेक वेळा प्रचाराला जाताना आमच्या कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. परंतु या धमक्यांना आम्ही भीक घालत नसून आम्ही बाहेरील उमेदवार असलो तरी आता पनवेलमध्ये आम्ही समरस झालो आहोत. त्यामुळे मतदार सुज्ञ आहेत. शिक्षित आहे. जो नागरिकांचे प्रश्‍न सोडवू शकतो अशा उमेदवारांच्या पाठीमागे नागरिक ठामपणे उभे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेच फक्त बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ फिरत आहेत. तर या उलट त्यांचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्या बरोबर ठामपणे उभे असल्याने येत्या 23 तारखेला निवडणुकीच्या वेळी ते दिसून येईलच. पनवेलचा विकास करण्यासाठी मला बहुमताने निवडून द्या असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले आहे.
फोटो ः लिना गरड प्रचार सभा
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image