उरण : उलवे नोडमधील रहिवाशाना सिडको पाणी वीज शाळा प्रवेश अशा अनेक समस्या भेडसावत आहेत माञ गेल्या पाच वर्षात येथील रहिवाशाना स्थानिक आमदाराचे दर्शन झाले नाही. त्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. जनतेच्या या समस्या दूर करण्यासाठी 24तास जनतेसोबत असणारे युवा नेतृत्व प्रितमदादा म्हाञे यानाच प्रचड बहुमताने निवडून गरजेचे आहे असे प्रतिपादन शेकापचे डॅशिग नेते सचीन ताडफळे यानी केले.
प्रितमदादा म्हाञे यांच्या प्रचाराच्या निमीत्ताने उलवे नोड येथे मतदाराच्या गाठीभेटी दौर्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते मतदाराशी हितगुज करताना बोलत होते. कार्यक्रमासाठी सोसायटीमधील रहिवासी युवा नेते अखिलेश, जेष्ट नेते जेएम म्हाञे, नारायणशेठ घरत, जितेंद्र म्हाञे आणि अनेक तरूण युवा कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना सचीन ताडफळे म्हणाले की सरकारने लाडकी बहिण योजना आणली माञ ही लाडकी बहिण निरोगी व दिर्घायुषी होण्यासाठी काही केले नाही. ते महत्वाचे काम प्रितमदादा म्हाञे करीत आहेत. स्ञीयांच्या ककर्रोग तपासणी, प्रतिबंधक लस देवून लाडक्या बहिणीला निरोगी राखण्याचे काम त्यानी निष्ठेने चालविले आहे. तसेच युवकाना रोजगार मिळवून देण्यासाठी सक्षम करणारे प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून देवून युवकाचे भविष्य सुरक्षित करण्याचे काम ते करीत आहेत. त्यामुळे जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या या उद्याच्या सुर्याला साथ देणे आपले कर्तव्य आहे. यावेळी प्रितम म्हाञे यानीही आपले मनोगत व्यक्त करून उद्याच्या निवडणूकीत शिट्टी जोरात वाजविण्याचे आवाहन केले.