पॅलिएटिव्ह व रिहॅबिलिटेशन युनिटचे उदघाटन
पनवेल वैभव / दि. ०३ (संजय कदम) : पनवेल मधील अत्याधुनिक सोयीसुविधांनी केलेले पनवेलमधील सूतिकागृह मल्टीस्पेलिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक पॅलिएटिव्ह व रिहॅबिलिटेशन युनिटचे आजच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर उदघाटन करण्यात आले.
सिप्लाच्या उल्का धुरी, सूतिकागृह मुलतीस्पेसिलीटी हॉस्पिटलचे चीफ ट्रस्टी विजय लोखंडे, सौ लोखंडे, दीप लोखंडे, ट्रस्टी परमार, डॉ अंजली लोमटवे, डॉ. सुजाता गायकवाड, डॉ अलित्या खान, डॉ स्वप्नील वाघ, डॉ श्रुती, निकेश जैन, वीरा निकेश जैन आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. याबाबत माहिती देताना चीफ ट्रस्टी विजय लोखंडे यांनी सांगितलॆ कि, पुण्यानंतर प्रथमच पनवेलमध्ये अश्या प्रकारची सेवा रुग्नांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त फायदा कॅन्सरग्रस्त रुग्ण ब्रेनस्ट्रोके रुग्ण, पॅरालिसिस रुग्ण यांना होणार आहे. यासाठी अश्या प्रकारच्या रुग्णांच्या कुटुंबीयाने आमच्या हॉस्पिटलबरोबर संपर्क साधावा. असे आवाहन त्यांनी केले तर उल्का धुरी यांनी सुध्दा आगामी काळात आम्ही या रुग्णालयात रुग्नांना चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने आरोग्य शिबीर व चांगले तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देऊ असे सांगितले. तर डॉ अंजली यांनी सुद्धा सांगितले कि,. अश्या प्रकारच्या रुग्णांना वेगळ्या प्रकारच्या रुग्ण सेवा देणे गरजेचे असते. आज या हॉस्पिटलला १०० वर्षे पूर्ण होत आहे त्यामुळे नवनवीन मल्टिपर्पज सेवा येथे देण्यात येत आहे. अश्याप्रकारच्या रुग्णांसाठी एक वेगळे दालन केले असून १० खाटा सर्व सुविधांनी युक्त असणार आहे. तरी या सुविधेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
फोटो : सूतिकागृह मल्टीस्पेलिटी हॉस्पिटल उदघाटन