उरण : खोपटे येथील अनेकांनी उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे प्रीतम म्हात्रे यांनी स्वागत केले.
उरण विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. तालुक्यातील खोपटे येथील अनेकांनी शेकाप मध्ये जाहीर प्रवेश केला. प्रितम जे एम म्हात्रे यांना या निवडणुकीत विजयी करायचे आणि आमदार बनवायचे असा ध्यास तरुणांनी घेतला आहे. त्यामुळे प्रितम म्हात्रे यांचा पाठिंबा वाढला आहे.