माथाडी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर..
समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी)कळंबोलीमध्ये झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर यांनी माथाडी कामगारांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचा विश्वास कामगारांना दिला.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ माथाडी कामगार मेळावा आयोजित केला होता. कामगारांच्या हितासाठी पडेल तो संघर्ष करण्याची तयारी भाजपची आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सांगितले.
या मेळाव्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादीचे नेते शिवदास कांबळे, भाजपचे माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट सेलचे उपाध्यक्ष संजय भगत, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, माजी नगरसेविका मोनिका महानवर, अमर ठाकूर, अशोक मोटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image