प्रितम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ उरणमध्ये सभेचे आयोजन, माजी आमदार जयंत पाटील यांची तोफ धडाडणार..
 माजी आमदार जयंत पाटील यांची तोफ धडाडणार
उरण : महाविकास आघाडी इंडिया, अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ 15 नोव्हेंबर रोजी उरण- डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक मराठी शाळेचे मैदान, उरण येथे सायंकाळी 6 ते 10 या वेळेत सभेचे आयोजन  करण्यात आले आहे. या सभेमध्ये माजी आमदार भाई जयंत पाटील यांची तोफ धडाडणार आहे. या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
       उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. अनेक मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. प्रीतम म्हात्रे यांना गावागावातून, शहरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. उरण शहराचा विकास हवा असेल तर प्रीतम म्हात्रे यांना निवडून देणे गरजेचे आहे. प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातून, बीजेपीतून शेतकरी कामगार पक्षात पक्ष प्रवेश केला जात आहे. त्यामुळे भाजपला खिंडार पडले आहे. शुक्रवार 15 नोव्हेंबर रोजी प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ उरण प्राथमिक मराठी शाळेसमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार भाई जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जयंत पाटील यांची तोफ धडाडणार आहे. येथील आमदाराने कोणतीही विकासाची कामे न केल्याने उरणचा मतदार, नागरिक उपेक्षित राहिला आहे. त्यामुळे प्रीतम म्हात्रे यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image