पेण मतदार संघाचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना जाहीर पाठींबा...
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पेण विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे उपस्थित होते.
अतुल म्हात्रे हे परदेशातून जाऊन उच्च शिक्षण घेऊन आलेले आहेत. ते पेशाने आर्किटेक्ट आहेत. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र शासन जे विविध प्रकल्पांच्या नावाखाली शेतकर्यांना वेठीस धरत आहे व शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहण करत आहेत त्याविरुद्ध त्यांनी पनवेल पेण मध्ये जोरदार आंदोलन केलेली आहेत.
त्यांच्याकडे या क्षेत्रातील अतिशय चांगला अभ्यास असल्यामुळे त्यांनी पनवेल व पेणमधील शेतकर्यांना पटवून दिले होते की शासन तुमची कशी फसवणूक करत आहे .
येथील शेतकरी देशोधडीला लागू नये म्हणून त्यांनी अनेक वेळा सरकारच्या विरोधात आंदोलने केलेली आहेत. अशा या तरुण तडफदार उच्च विद्या विभूषित उमेदवारस निवडून द्यावे असे आवाहन महेश साळुंखे यांनी पेणच्या सर्वसामान्य मतदारांना केलेले आहे . अतुल म्हात्रे यांच्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होणार होतं त्या नुकसानीला आळा बसलेला आहे. महेश साळुंखे यांनी स्वाभिमानीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की पनवेल उरण आणि पेण मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात यावा व जास्तीत जास्त मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे अशा प्रकारे प्रचार करण्याचे आवाहन केलेले आहे.
फोटो ः महेश साळुंखे पाठींबा