सदस्य नोंदणीत प्रत्येकाने सहभाग घ्यावा- आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) जनतेच्या साक्षीने राज्यात आपल्याला अभूतपूर्व असे यश मिळावे आहे, आता पक्षवाढीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सदस्य नोंदणीत प्रत्येकाने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने संघटन पर्व २०२४ सदस्यता अभियान आयोजित करण्यात आले आहे, त्या अनुषंगाने नियोजनाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बैठक पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, आमदार विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस व पनवेल विधानसभा संयोजक नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, दीपक बेहेरे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, सुनिल घरत, वसंत भोईर, चंद्रकांत घरत, रमेश मुंढे, रुपेश धुमाळ, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी रायगड जिल्हा भाजपच्यावतीने जिल्ह्यातील सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, आदिती तटकरे, महेश बालदी, रवीशेठ पाटील, भरतशेठ गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी या सातही महायुतीच्या विजयी उमेदवारांचा तसेच कोकणाचे मार्गदर्शक ठरलेले नामदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष अभिनंदन या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले. या बैठकीत चौथ्यांदा विजयी होऊन रायगडमध्ये इतिहास घडविणारे आमदार प्रशांत ठाकूर, तसेच जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पडणारे अविनाश कोळी यांचा जिल्ह्याच्यावतीने सत्कार करण्यात आला.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, आपले नेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे व नेते यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मोठे यश मिळवले आहे, त्याबद्दल सर्व पक्षश्रेष्ठी, महायुतीचे सर्व नवनिर्वाचित आमदार यांचे अभिनंदन करत असून या सर्व विजयात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले. आता पक्षाने सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे, ते यशस्वी करण्यासाठी सर्वानी कटिबद्ध रहावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच विजयानिमित्त केलेल्या सत्काराबद्दल सर्वांचे आभारही त्यांनी व्यक्त केले.
विधानसभेच्या निवडणुकीतील यश मिळविले भाजपने आता राज्यभर पक्ष सदस्य नोंदणी अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मोबाईलवर मिस्ड कॉल करून सदस्यत्व घेता येणार आहे. संघटनात्मक जबाबदारी घेऊन काम करणाऱ्यांना वैयक्तिक कमीत कमी दोनशे प्राथमिक सदस्य करणे आवश्यक आहे. भाजपचे सदस्यत्व मिळवण्यासाठी ८८०००२०२४ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर एक मेसेज प्राप्त होईल. ज्यामध्ये प्राथमिक सदस्यत्व नोंदणी क्रमांक दिला जाईल. राज्यात एक कोटी ५१ लाख प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे या अभियानाचे राष्ट्रीय संयोजक असून, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील हे प्रदेश संयोजक आहेत. जिल्ह्यात कमीत कमी दहा लाख प्राथमिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.