राष्ट्रीय फार्मसी सप्ताह निमित्त फार्मासिस्टस साठी विशेष फार्मसी मॅनेजमेंट कोर्स
राष्ट्रीय फार्मसी सप्ताह निमित्त फार्मासिस्टस साठी विशेष फार्मसी मॅनेजमेंट कोर्स
पनवेल वैभव वृत्तसेवा : -
महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल च्या औषध माहिती केंद्राच्या (DIC) तर्फे, आप्पासाहेब शिंदे, अतुल अहीरे, धनंजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली व DIC प्रमुख गणेश बंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारणी सदस्य नितीन मणियार, जिल्हा अध्यक्ष लीलाधर पाटील, जिल्हा सचिव प्रविण नावंधर व समन्वयक संतोष घोडिंदे यांच्या पुढाकाराने.
फार्मसी मॅनेजमेंट कोर्सचे आयोजन 24 नोव्हेंबर 2024 रोजी डी डी विसपुते कॉलेज ऑफ फार्मसी, देवद, पनवेल येथे करण्यात आले.
सदर कोर्स मध्ये पूजा निकम यांनी व्यवसायातील मॅनेजमेंट चे महत्व, झिरो एक्सपायरी ठेवण्याचे तंत्र,
व्यवसायात नफा वाढवण्याचे उपाय, ग्राहकांना आकर्षित करुन समाधानी करण्याच्या पद्धती या विषयी केलेल्या मार्गदर्शनात अभ्यासाचे गांभीर्य स्पष्टपणे जाणवत होते. प्रत्येक गोष्ट अतिशय प्रभावी पद्धतीने समजावून सांगितली गेली. जेणेकरून फार्मासिस्ट आपल्या फार्मसी व्यवसायात प्रगती साधण्यासाठी आणि व्यवस्थापन कौशल्ये वाढवण्यासाठी प्रयत्न करेल, व प्रत्येक फार्मासिस्ट आपला डिस्काउंट रुपी नुकसान न करता चांगली रुग्णसेवा एक अनोखी पद्धतीने करु शकेल हा आत्मविश्वास सर्वाना मिळवून दिला. प्रत्येक फार्मासिस्टचा वेळ अर्थपूर्णरीत्या सत्कारणी लागला.
कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुणे नितीन मणियार सदस्य MSPC, सुनिल छाजेड सचिव मुंबई झोन, कॉलेज चे प्राचार्य डॉ. आशिष जैन,जिल्हा अध्यक्ष लीलाधर पाटील, उपाध्यक्ष विवेक शिंदे व इतर मान्यवरांनी दिप प्रज्वल करून केली. या कोर्स साठी 40 फार्मासिस्टस तसेच विविध फार्मसी कॉलेज चे 10 प्रोफेसर्स observers म्हणून सहभागी झाले होते.

प्रत्येक फार्मासिस्टचा प्रत्येक सत्रामधील सहभाग उल्लेखनीय होता.त्याच बरोबर DIC MSPC चे भूषण माळी यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या फार्मासिस्ट्स चे विशेष कौतुक आणि आभार समन्वयक :  महाराष्ट्र राज्य औषध परिषद (MSPC) संतोष शंकर घोडिंदे यांनी केले
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image