आ.प्रशांत ठाकूर यांच्या सलग चौथ्यांदा विजयाबद्दल शिवसेनेने केले विशेष अभिनंदन..
पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः पनवेल विधानसभा मतदार संघात आ.प्रशांत ठाकूर यांनी सलग चौथ्यांदा विजयी चौकार मारल्याबद्दल महायुतीतर्फे शिवसेनेने त्यांची आज भेट घेवून विशेष अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख अॅड.प्रथमेश चंद्रशेखर सोमण, उपमहनगर प्रमुख महेश सावंत, पनवेल शिवसेना शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, खंडेश धनावडे आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देवून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो ः शिवसेना सत्कार