आपण कोणाच्या जीवावर उड्या मारता असा प्रितम म्हात्रे यांचा सवाल...
मुलगा हा आपल्या बापाच्या जीवावरच उड्या मारत असतो. त्यामुळे आम्ही आमच्या बापाच्या जीवावर उड्या मारतो पण आपण कोणाच्या जीवावर उडया मारता ते आमच्यावर टीका करणाऱ्यांनी सांगावे असा खरमरीत सवाल उरण विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांनी उरण चाणजे परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीत केला आहे.
उरण विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांनी आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांना तरुणाईचा पाठींबा मोठ्या प्रमाणात मिळताना दिसत आहे. आज उमेदवार प्रितम म्हात्रे यांची प्रचार रॅली चाणजे परिसरात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या परिसरातील आगरी कोळी व कराडी तसेच इतर समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करून रॅलीला प्रतिसाद दिला.
यावेळी उमेदवार प्रितम म्हात्रे यांच्याशी पत्रकारांनी सवांद साधला असता येत्या २३ तारखेला उरण विधानसभा मतदारसंघात शिट्टीचा आवाज घुमणार यात कोणतीच शंका नाही हे तुम्हांला दिसेल. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने ते आमच्यावर बेताल आरोप करीत आहेत. यामध्ये दुसऱ्या मतदारसंघातील असल्याचा तसेच बापाच्या जीवावर उड्या मारतो अशी टीकास्त्र सोडले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की उरण विधानसभा मतदारसंघात उरण बरोबर पनवेल, खालापूर मधील ही भाग येत आहे मग त्यांनी या उमेदवारांना दुसऱ्या मतदारसंघातील असल्याचे म्हणायचे का, तसेच कोणताही मुलगा हा बापाच्याच जीवावर उड्या मारतो, त्यामुळे मी ही बापाच्या जीवावर उड्या मारतो, मग आपण कोणाच्या जीवावर उड्या मारता ते मतदारांना सांगावे असा सवाल भाजपचे उमेदवार महेश बालदी यांना केला. तसेच त्यांनी आगरी कोळी व कराडी तसेच आदिवासी समाजाबद्दल काढलेले उदगार शोभनिय नसल्याने त्यांना पराभव दिसू लागल्याने ते अशी वक्तवे करीत असल्याचे प्रितम म्हात्रे यांनी सांगत मी व मनोहरशेठ भोईर यांच्यात मैत्रीपूर्ण लढत असल्याचा दावाही यावेळी केला.
यावेळी माजी सभापती सागर कडू, माजी उपसभापती वैशाली पाटील, महिला नेत्या सीमा घरत, काका पाटील, किरण घरत, नित्यानंद भोईर, निलेश पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचारात प्रितम म्हात्रे यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याने उरण विधानसभा मतदारसंघात ते नक्कीच निवडून येथील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.