श्री रणछोड देवस्थान (शनि मंदिर)या मंदिराचा जिर्णोद्धार समारंभ विधीवतरित्या संपन्न..
मंदिराचा जिर्णोद्धार समारंभ विधीवतरित्या संपन्न..

पनवेल दि.19 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील श्री रणछोड देवस्थान ट्रस्ट यांच्या श्री रणछोड देवस्थान (शनि मंदिर) या मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम आज सोमवार दि.25 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता विधीवतरित्या संपन्न झाला. 
यावेळी पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर व त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर त्याचप्रमाणे शिवसेना महानगरप्रमुख अ‍ॅड.प्रथमेश सोमण हे सपत्नीक तसेच सुनील खळदे, चेतन देशमुख, यतीन देशमुख आदी या विधीवत कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले. या जिर्णोद्धार समारंभासाठी मा.सभागृह नेते परेश ठाकूर, उद्योजक अरविंद सावळेकर, मा.नगरसेविका दर्शना भोईर, राजू सोनी, अजय बहिरा, पवन सोनी, उपमहानगरप्रमुख महेश सावंत, मंदार काणे, अ‍ॅड.अमर पटवर्धन, चारु पन्हाळे, बिपीन मुनोत, पत्रकार संजय कदम, आर्कीटेक अभिनव पाटकर, महेश गायकवाड, केदार भगत, अमरिश मोकल यांच्यासह पनवेलकर व नेहमीच दर्शनाला येणारे भाविक वर्ग कार्यक्रमात सहभागी झाले होते.
फोटो ः श्री रणछोड देवस्थान (शनि मंदिर) या मंदिराचा जिर्णोद्धार समारंभ
Comments