सुवर्णकार समाजाच्यावतीने महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा
पनवेल (प्रतिनिधी) भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाने पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाचे अध्यक्ष संजय खरोटे यांनी पाठिंबा पत्र दिले आहे. नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांना देण्यात आलेल्या पाठिंबा पत्रात म्हंटले आहे कि, खारघर, कळंबोली, नावडे, तळोजा, खांदेश्वर, कामोठे, खांदा कॉलनी, पनवेल, नवीन पनवेल व परिसरातील सर्व सुवर्णकार समाज स्थायिक रहिवाशी सभासद बंधू भगिनींतर्फे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाचे सभासद व त्यांचे कुटुंबीय असे समस्त सुवर्णकार समाज बांधव मतदार आपल्या सदैव पाठीशी असल्याचे नमूद करून भरघोस मतांनी विजयी होण्यासाठी शुभेच्छाही या पत्रातून दिल्या.