महाराष्ट्र ओ.बी.सी. सेनेचा उरण मतदार संघ प्रितम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा..
महाराष्ट्र ओ.बी.सी. सेनेचा उरण मतदार संघ प्रितम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा
उरण : उरण मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचे प्रितम जे एम म्हात्रे यांना विजयी करा आणि त्यांच्या शिट्टी चिन्हावरील बटण दाबा. असे आवाहन महाराष्ट्र ओ.बी. सेनेचे (एन.यु.बी.सी) अध्यक्ष शरद भोवर यांनी ओ. बी. सी., धनगर, वंजारी व भटक्या विमुक्त आणि केंद्राच्या यादीतील सर्व ओ.बी.सी जनतेला केलेले आहे. 
        १ मे १९७१ रोजी स्व. गजानन राव भोवर आणि
अॅड जर्नादन पाटील व अॅड नारायणराव कोळी यांच्या मदतीने अखिल माघास संघर्ष कमिटी स्थापन केली होती. गजानन राव भोवर हे कट्टर जनसंघाचे व ओ.बी.सी. चळवळीचे मुळ संस्थापक होते. त्यांनी केलेल्या त्यागामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. परंतु गेल्या १० वर्षात भाजपाने महाराष्ट्रतील ६.५ कोटी गरीब ओ.बी.सी. दुर्बल घटकांचे फारच नुकसान केले. खाजगीकरण करून त्यांच्या सरकारी नोक-या घालवल्या. त्यामुळे मंडल आयोग छिन्ह विछिन्न करणा-या भाजपाला एकही मत न देता स्व. दि. बा. पाटील यांचा अपमान करणा-या उमेदवाराचा दारुण पराभव करा. व एकजुटीने शे.का पक्षाच्या प्रितम जे एम म्हात्रे यांना विजयी करा. असे आवाहन केले आहे. मंडळ आयोग हा संपूर्ण कायदेशीर व सर्व प्रक्रीया पार पाडून १९९४ पासून केंद्र व महाराष्ट्रात आमच्या संघटनेने लागू केला. त्याकरिता प्रचंड संघर्ष केला. त्यांची जाणीव ठेवून सर्व ओ.बी.सी जनतेने जागृत होउन प्रितम जे एम म्हात्रे यांच्या शिट्टी चिन्हासमोरील बटण दाबावे. असे आवाहन अध्यक्ष शरद भोवर व सरचिटणीस कृष्णा सहदेव मोरे यांनी केले आहे.
Comments