खारघरच्या मदरहुड हॉस्पिटल्समध्ये बालदिन मोठया उत्साहात साजरा..
मोफत आरोग्य तपासणी, मनोरंजनात्मक खेळ,जादुचे प्रयोग आणि भेटवस्तूंची लयलूट

नवी मुंबई  : - खारघरच्या मदरहूड हॉस्पिटल्स येथे बाल दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाल आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत याठिकाणी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ब्युटीफुल टुमॉरो फाउंडेशन आणि एस.एच. दिव्यांग शाळा यांच्या सहयकार्याने बालदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात 56 हून अधिक मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश होता. या उपक्रमातंर्गत अत्यावश्यक आरोग्य तपासण्यांबरोबरच विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांची शारीरीक वाढ आणि त्यांच्या सर्वांगीण आरोग्याचे मूल्यमापन करण्यात आले.

हल्ली बदलत्या जीवनशैलीशी बरोबरच आरोग्य समस्यांमध्येही वाढ होत आहे. लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता, स्वयंप्रतिकार रोग आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या दिवसेंदिवस चिंताजनक ठरल्या आहेत. बैठी जीवनशैली, आहाराच्या चूकीच्या सवयी आणि वाढता स्क्रीन टाईम यासारखे घटक यास कारणीभूत ठरतात. याकरिता वेळीच निदान व प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.

मदरहुड हॉस्पिटलमध्ये आम्ही प्रत्येक मुलाचे आरोग्य  चांगले रहावे यासाठी प्रयत्नशील असतो. *डॉ. अनिश पिल्लई(नवजात शिशू व बालरोग तज्ज्ञ,मदरहुड हॉस्पिटल) सांगतात की,* या कार्यक्रमात मोफत आरोग्य तपासणीसह याठिकाणी उपस्थित कार्टून्स, जादुचे प्रयोग आणि मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहण्याजोगा होता.

डॉ. पिल्लई पुढे सांगतात की, ही लहान मुले हे आपल्या देशाचे भविष्य असून त्यांची शारीरीक वाढ आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य सुविधा पुरवणे गरजेचे आहे. प्रत्येक बालकाला निरोगी जीवन जगण्यासाठी उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा मिळविण्याचा अधिकार आहे.

*मदरहूड हॉस्पिटलच्या फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. रुपाली सुनील कदम सांगतात की,* जीवनशैलीशी संबंधित आरोग्य समस्यांमध्ये वाढ हे प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करते. आम्ही पालकांना नियमित तपासणीचे महत्त्व पटवून देतो तसेच आणि निरोगी जीवनशैलीची निवड करण्याचा आग्रह करतो. मुलांना निरोगी जीवन जगता यावे यासाठी खरोखरच जागरुकतेची आवश्यकता आहे.

याठिकाणी उपस्थित मुलांनी केक कापला व या मुलांना खास भेटवस्तू देण्यात आल्या. या मुलांनी त्यांच्या आवडत्या गाण्यांवर नृत्य करत, खेळाचा आनंद लूटत या कार्यक्रमाचा आनंद लूटला.

*मनीषा पी. ठाकरे(ब्युटीफुल टुमारो फाउंडेशन, एसएच दिव्यांग केंद्राच्या प्राचार्या) सांगतात की,* हा बालदिन सोहळ्याचे आयोजित करत मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी  राबविलेल्या विविध उपक्रमांसाठी आम्ही खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलचे कौतुक करतो. आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा सोहळा अतिशय आनंददायी ठरला आणि याठिकाणी मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून यासाठी रुग्णालयाचे विशेष आभार मानते. आमच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविले जातील अशी अपेक्षा करतो.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image