व्हिस्टा प्रोसेस प्रा.लि.कंपनीकडून डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयास डायलेसिस रुग्णांसाठी 5 लाखाचा धनादेश..
      डायलेसिस रुग्णांसाठी 5 लाखाचा धनादेश
पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः तळोजा येथील व्हिस्टा प्रोसेस प्रा.लि.कंपनीकडून पनवेल शहरातील न रा. स्व. संघ जनकल्याण समिती डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयास डायलेसिस रुग्णांना मदत म्हणून 5 लाखाचा धनादेश कंपनीचे एम.डी.भुपेंदर सिंग यांनी सुपूर्द केला.
यावेळी रुग्णालयाच्या अध्यक्षा डॉ.किर्ती समुद्रे, मुख्य संचालक व्यवस्थापक सुनील लघाटे व रुग्णालय जनसंपर्क अधिकारी प्रसन्न खेडकर यांना सुपूर्त केला. अशा दानशूर व्यक्तिंच्या आर्थिक सहकार्‍यांने रुग्णालय रुग्णांना केवळ रु. 500/- व ज्यांना हे पण जास्त  आहेत त्यांना रु.300/- मध्ये डायलेसिस करते. या संदर्भात चर्चा करताना त्यांनी रुग्णालय करत असलेल्या कामाचे कैतुक केले. रुग्णालय  व कंपनी मधिल दुवा म्हणून कंपनीचे सल्लागार चंद्रशेखर सोमण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रुग्णालय व्यवस्थापन समिती कडून त्यांचे व कंपनीचे विशेष आभार मानण्यात आले.


फोटो ः 5 लाखाचा धनादेश सुपूर्द
Comments