मोहोपाडा रसायनी येथे सुपर स्पेशालिटी अष्टविनायक हॉस्पिटलचे लोकार्पण
पनवेल / वार्ताहर : -सोमवार दि. 25 नोव्हेंबर रोजी मोहोपाडा रसायनी येथे सुपर स्पेशालिटी अष्टविनायक हॉस्पिटलचे लोकार्पण सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वासांबे आणि माजी महिला बाल सभापती रायगड जिल्हा परिषद सौ. उमाताई संदीप मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यासाठी रसायनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बांगर उपस्थित होते.
18 वर्षांपासून अष्टविनायक हॉस्पिटल खांदा कॉलोनी, नविन पनवेल (पश्चिम) येथे सर्व सुविधांयुक्त सेवा देत आहे. हे हॉस्पिटल देशातील सर्वांत महत्वाचे मानांकन असलेला रायगड मधिल आणि नवी मुंबईतील पहिले संपूर्ण एन. ए .बी. एच. असलेले हॉस्पिटल आहे. त्यांची दुसरी शाखा मोहोपाडा येथे सुरु करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या दुमजली इमारतीत एकूण सध्या 50 खाटांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. भविष्यात 100 खाटांची उपलब्धता करून देण्याचा त्यांचा मानस आहे.
हृदय रोग निवारण साठी सुसज्ज कॅथ लॅब, 2 आधुनिक ऑपरेशन थिएटर, 1 प्रसूती गृह, 10 खाटांचे परिपूर्ण अतिदक्षता विभाग, 4 विभागून प्रशस्त वार्ड, 15 विशेष आणि अतिविशेष खोल्या, अतिदक्षता विभाग, डायलेसिस, पॅथॉलॉजी, फार्मसी, ऍम्ब्युलन्स इत्यादी सेवा उपलब्ध असल्याची माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय अधिकारी रुपेश यादव यांनी करून दिली.
या हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. अक्षदीप अगरवाल आणि रुची अगरवाल यांनी या हॉस्पिटलमध्ये सर्वोतोपरी सेवा देण्याचे त्यांचे उद्दिष्ट्ये असल्याचे सांगितले. तसेच या हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, कँसर, पोटातील विकार, हाडांचे, सांध्यांचे आणि पाठीच्या मणक्याचे आधुनिक पद्धतीचे ऑपरेशन्स तसेच मुतखडा, किडनीचे आजार, डायबिटीज, ब्लडप्रेशर आणि थायरॉईड मॅनेजमेंट, स्त्रियांचे आजार, गर्भधारणा आणि प्रसूती विभाग उपलब्ध असल्याचे सांगितले.
तसेच 24 तास आपत्कालीन व अपघातातील रुग्णांसाठी सेवा देणार असल्याचे ही कळविले.
तसेच डॉ. अगरवाल यांनी सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध होणार असून त्याबरोब राज्य कामगार विमा, जीवनदायी योजना सुरु करणार असल्याचे ही सांगितले आहे.
एकंदरीत संपूर्ण आजूबाजूचा परिसर, आणि आसपास असलेल्या गावातील लोकांसाठी आणि कंपनीतील अधिकारी व कामगारांच्या परिवारासाठी सर्व सोयीने परिपूर्ण असे हॉस्पिटल रसायनी येथे सुरु झाल्यामुळे अनेकांना पनवेल किंवा नवी मुंबई, मुंबई येथे आरोग्य सेवा अथवा आपत्कालीन परिस्थितीत जाण्याचे प्रमाण आता कमी होणार असल्याचे निदर्शनास येत आहे.