खांदेश्वर पोलिसांतर्फे मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन...
पनवेल वैभव, दि.11 (संजय कदम) ः मानवी हक्क दिनानिमित्त समाजातील तळागाळातील जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहिती होणे व त्याबाबत जनजागृती करिता कार्यक्रम खांदेश्वर पोलीस ठाण्यामार्फत राबविण्यात आला.
खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत जिल्हा परिषद शाळा, आसूडगाव, आगरी शाळा, से.6, खांदा कॉलनी, पनवेल येथे विद्यार्थी/विद्यार्थिनी व शिक्षकांना मानवी हक्क दिन निमित्त पोलीस दलाची माहिती दिली त्याचप्रमाणे सायबर सुरक्षा व गुन्हे प्रतिबंध., व्यसन मुक्ती व अंमली पदार्थ प्रतिबंध., आर्थिक फसवणूक व प्रतिबंधक उपाय., जेष्ठ नागरिक सुरक्षा व काळजी., मुली, महिला व बालकाची सुरक्षा, महिलांच्या विरोधातील घटना, नवी मुंबई पोलीस व्हॉट्सअप चॅनेले फॉलो करण्यास सांगितले व नागरिकांचे पोलिस मदतीसाठी डायल 112 व साइबर फ्रॉड हेल्पलाईन 1930 क्रमांकाची माहिती देऊन त्याचा प्रसार नागरिकामध्ये करावा. यांसारख्या विषयांवर माहिती देण्यात आली. सदर वेळी 80 ते 90 विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते. सदर उपक्रम खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वपोनि स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
फोटो ः खांदेश्वर पोलिसांतर्फे जनजागृती