पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध...
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध...
   

पनवेल(प्रतिनिधी) बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्यावतीने आज (दि. १०) जागतिक मानवाधिकार दिनी पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.  बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार तातडीने थांबिवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पनवेल रेल्वे स्थानक ते पनवेल बस डेपो अशा मार्गाने हजारोंच्या संख्येने मानवी साखळी करत हे आंदोलन करण्यात आले.  
               या आंदोलनात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष  जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, दीपक बेहेरे, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, संतोष शेट्टी, तेजस  कांडपिळे, अभिमन्यू पाटील, दर्शना भोईर,  नीता माळी, नेत्रा पाटील, अजय बहिरा, मनोज भुजबळ, एकनाथ गायकवाड, राजू सोनी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा आश्विनी पाटील, वर्षा प्रशांत ठाकूर, स्वाती कोळी, संजय जैन, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, अमित जाधव, किशोर सुरते, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, कामोठे अध्यक्ष रवी जोशी,रुपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे, विजय पाटील, बिना गोगरी, संध्या शारबिद्रे, अनेश ढवळे, हर्षवर्धन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, केदार भगत, विद्या तामखेडे
अनंत गायकवाड अविनाश गायकवाड, योगेश लहाने, डॉ. कृष्णा देसाई, भीमराव पोवार त्याचबरोबर विविध संस्था संघटनांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. यावेळी आंदोलनांच्या अनुषंगाने २५७० हिंदू बंधुभागिनींनी आपली नोंद केली होती. यावेळी भारत
माता की जय, जय जय श्रीराम, बंद करा बंद करा अत्याचार बंद करा, एक है तो सेफ है अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर फलक दर्शवण्यात आले. 
        बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवीय अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी, आदिवासी व दलित हिंदू बांधवांना ईस्लामी कट्टरता वाद्यांच्या अमानवीय अत्याचारांपासून मुक्ती मिळावी .
बांगलादेशचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचास मूकसंमतीच देताना दिसून आली आहे.  बांगलादेशात अलीकडेच सत्तांतर झाले व महंमद युनूस यांच्या नेतृत्वात अराजकाचे सरकार स्थापित झाले आहे. जेव्हापासुन हे सरकार अस्तित्वात आले तेव्हा पासुन बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू हे कट्टरपंथी मुस्लिम अराजकतावादी मुस्लिम यांच्या अत्याचाराचे बळी जात आहेत. हिंदू व इतर अल्पसंख्याक समुदायातील जनतेवर मुस्लीम कट्टरपंथीयांकडून होत असलेले हल्ले, हत्या, लूटमार, दरोडे, जाळपोळीच्या घटना, महिलांवरील अत्याचार, अल्पसंख्याक समुदायातील मुलं व महिलांवरील अमानवीय अत्याचार हा भारतातील हिंदू समुदायाला चिंता करायला लावणारा आहे. हे सर्व अत्याचाराचे प्रकार बांगलादेशातील सरकारी यंत्रणा व पोलीस यांच्या देखरेखीत घडत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. संरक्षण यंत्रणा तिथल्या अल्पसंख्याकांना वाचवण्याऐवजी मूकदर्शक बनल्या आहेत. त्याच वेळी बांगलादेशमधील हिंदूंनी त्यांच्यावरील अन्याय, अत्याचारांनंतर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथल्या सरकारने त्यांचा आवाज दाबून ठेवला आहे. तिथल्या हिंदूंनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र बांगलादेशी सरकारने हिंदूंची आंदोलनं चिरडली. इस्कॉनचे हिंदू धर्मगुरु श्री चिन्मय दास यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली. त्यांच्या वकीलांची हत्या करण्यात आली. त्यांच्या समर्थकांना भारताचा व्हिसा असताना देखील भारतात येण्यास मनाई करण्यात आली. या सर्व अत्याचारांची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे. त्यामुळे तातडीने अत्याचार थांबण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने मानवी साखळीतून जोरदार मागणी करण्यात आली. त्याचबरोबर अत्याचाराविरोधात तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. 

चौकट- आज बांग्लादेशातील हिंदुंच्या वर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधासाठी प्रचंड संख्येने हिंदू जमा झाले होते. सर्व भाषिक, सर्व पंथांचे, विविध जातींचे, अनेक हिंदु संघटनांचे, नारीशक्ति, भगवे ध्वज, मनगटावर काळ्या फिती असा सकल हिंदू समाज एकवटला होता. शिस्तबद्ध, सर्व नियम पाळून मानवी साखळी आणि जनसभा असा भव्य कार्यक्रम झाला
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image