शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान
पनवेल, दि.24 (वार्ताहर) ः 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे कामोठे रेल्वे स्थानक येथे ग्राहक जागृती अभियान राबविण्यात आले.
शिवसेना नेते, सचिव व अध्यक्ष अनिल देसाई यांच्या आदेशानुसार आज कामोठे रेल्वे स्थानक येथे जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक जागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी शिवसेना ग्राहक कक्षाचे जिल्हा सह संघटक शशिकांत डोंगरे, कामोठे शहर शिवसेना प्रमुख रामदास गोवारी, शिवसेना शहर संघटक कामोठे संतोष गोळे, कामोठे सह शहर संघटक गणेश खांडगे, माजी शिवसेना शहरप्रमुख धाया गोवारी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्राहकांना त्यांचे हक्क या संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच वाढत्या ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नये, ग्राहकांकरिता सर्वसमावेशक व सुरक्षितता देणारा कायदा असावा, या संदर्भात माहिती देण्यात आली.
फोटो ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राबविण्यात आले जनजागृती अभियान
Comments