आमदार प्रशांत ठाकूर यांनी संस्कृतमधून घेतली आमदार पदाची शपथ....
पनवेल / प्रतिनिधी : -
विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार मारणारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी संस्कृतमधून घेतली आमदार पदाची शपथ ....
आज विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं असून विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होत आहे. सलग चौथ्यांदा विधानसभा सदस्य झालेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा असलेल्या संस्कृतमधून आमदार पदाची शपथ घेतली.