दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेतर्फे आज जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून पनवेल शहरातील पनवेल महानगरपालिका, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दिव्यांग दिन सोहळा मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाद्वारे संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील, नायब तहसीलदार विनोद लचके, संघटना सचिव राजाराम गोरे, सल्लागार वाशीकर, मनसेचे प्रवक्ते योगेश चिले, सिडकोच्या अधिकारी सोनल पाखोडे, व्ही क्लब ऑफ गर्ल्स इन पर्ल्स, पनवेलच्या अध्यक्षा नेहा शेंडे, सचिव किर्ती पाटील, खजिनदार विश्‍वनंदना मुंबईकर, खजिनदार विनोद देवकर, अंजु कोळी, पनवेल महापालिकेचे संजय गायकवाड, भगवान काचले, सचिन सणस, अंबालाल पटेल, उज्वला नलावडे, अनिता मसुदे, शर्मिला मोरडे, धम्मपाल टापरे, महेंद्र मंडळ, मुरगन अण्णा, शारदा चव्हाण, दशरथ वाघेला आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी व्ही क्लब ऑफ गर्ल्स इन पर्ल्स, पनवेलच्या वतीने उपस्थित दिव्यांग बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. तसेच नायब तहसीलदार विनोद लचके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, संजय गांधी योजनेद्वारे बांधवांना विविध योजना उपलब्ध आहेत त्याचा फायदा बांधवांनी घ्यावा, तसेच यासाठी पनवेल तहसील कार्यालयात वेगळा विभाग आहे तेथे येवून माहिती घ्यावी, नवीन नियमानुसार आता बांधवांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपला मोबाईल नंबर, आधारकार्ड नंबर, बँक पासुबक अपडेट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील यांनी मार्गदर्शन करताना आज समाजात दिव्यांग बांधवांना मानाचे स्थान मिळावे यासाठी शासनाने सुद्धा विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यांच्या अडीअडचणी सोडविणे गरजेचे आहे. तसेच या बांधवांना कुठल्याही प्रकारची अडीअडचणी आल्यास आमची संघटना सदैव त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहिल, असेही आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.
फोटो ः दिव्यांग दिन
Comments