गोल्डन ग्रुप पनवेलच्या अध्यक्षपदी वसंत भगत
पनवेल / प्रतिनिधी : -
पनवेल मधील बहुचर्चित गोल्डन ग्रुप पनवेल च्या अध्यक्षपदी नुकतीच वसंत भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या गोल्डन ग्रुप पनवेलच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वसंत भगत यांची सर्वानुमते अध्यक्ष पदी निवड झाली तर सरचिटणीस पदी नीलकंठ भगत उपाध्यक्षपदी अनिल नलावडे आणि खजिनदारपदी रत्नाकर पाटील यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली.
गेली वीस वर्षे सातत्याने गोल्डन ग्रुप पनवेल हा समाजकारणात अग्रेसर राहिलेला ग्रुप आहे. गोल्डन ग्रुप तर्फे आजपर्यंत तालुक्यातील अनेक आदिवासी शाळांची दुरुस्ती करण्यात आली आहे त्याचप्रमाणे येथील विद्यार्थ्यांना दप्तरे वाटप, वह्या पुस्तकांचे वाटप, तसेच गणवेश वाटप कार्यक्रम करण्यात येत असतो. त्याचबरोबर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे, आरोग्य शिबिर भरवणे असे कार्यक्रम देखील गोल्डन ग्रुप राबवीत असतो. महाराष्ट्रात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात असताना गोल्डन ग्रुपने नेहमीच आपला मदतीचा हात आपत्तीग्रस्तांसाठी पुढे केला आहे. अनेक वेळा गोल्डन ग्रुप तर्फे नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. यापुढे देखील गोल्डन ग्रुप समाजकारणात अशाच प्रकारे सहभाग घेत राहील अशी ग्वाही यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष वसंत भगत यांनी दिली.
याप्रसंगी मावळचे अध्यक्ष अमोल गवारी, विवेक पाटील, प्रकाश फडके, विजय पाटील, आशुतोष पाटील, पप्पू गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते.