जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी दिलेला शब्द पाळला ; ओबीसी प्रदेशाध्यक्षांना स्कॉर्पिओ गाडी भेट...
    ओबीसी प्रदेशाध्यक्षांना स्कॉर्पिओ गाडी भेट...
     
पनवेल / प्रतिनिधी  : - बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या उक्तीप्रमाणे रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे समाजकार्य सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी भानुदास माळी यांनी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष पद स्विकारल्या नंतर रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी त्यांना महारष्ट्रात फिरण्यासाठी नवीन गाडी देतो असा शब्द दिला होता. शब्दाला पक्के व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आज दिनांक ९ जानेवारी रोजी आपला शब्द पुरा करत ओबीसी प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांना नवीन ऑटोमॅटिक स्कॉर्पिओ गाडी भेट दिली. माळी यांच्या हस्ते उलवे येथे गाडीचे पूजन करून जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी त्यांना गाडीच्या चाव्या सुपूर्द केल्या. 
यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना भानुदास माळी  म्हणाले की महेंद्रशेठ घरत म्हणजे ओबीसी समाजासाठी भूषण आहेत.त्यांच्या सारखा दानशूर नेता ओबीसी समाजाचं नेतृत्व करत आहेत हे आपल्या समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्र काँग्रेसला गरज आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसला नवसंजीवनी द्यायची असेल तर महेंद्रशेठ घरत यांनी भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 
यावेळी महेंद्रशेठ घरत यांचे सहकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments