पोलीस रेझिंग डे सप्ताह अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांची पनवेल पोलीस ठाणे येथे भेट ...
पनवेल / प्रतिनिधी : -
पोलीस स्थापना दिनाच्या औचित्याने दिनांक 2
२ जानेवारी ते ८ जानेवारी २०२५ दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत असून त्याअंतर्गत आज दिनांक २ जानेवारी रोजी ११.१५ ते १२.१५ वाजेपर्यंत पनवेल शहर पोलीस ठाणे येथे 'याकूब बेग विद्यालय, पनवेल येथील विद्यार्थ्यांच्या पोलीस ठाणे भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस ठाणे कामकाजाची माहिती देण्यात आली तसेच शस्त्रास्त्रांसंबंधी माहिती दिली. यावेळी १०० विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.