भारतमाता व संविधान पूजन आणि घंटानाद..
भारताचे संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतमाता आणि संविधान चे पूजन करून घंटानाद करण्यात आला. लोकशाही टिकविण्यासाठी प्रजेच्या विचार सोहळयासाठी सर्व देशप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे करण्यात आले होते.पनवेल येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे २५जानेवारी रोजी सायंकाळी भारतमाता आणि संविधान पूजन व घंटानाद करण्यात आला.
यावेळी शिरीष घरत जिल्हा प्रमुख, शिरीष बुटाला सल्लागार, रामदास पाटील उपजिल्हा प्रमुख, दिपक निकम, दिपक घरत, अच्युत मनोरे, ज्ञानेश्वर बडे,पराग मोहिते, प्रदीप ठाकूर, शहर प्रमुख प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, यशवंत भगत, रामदास गोवारी ,यतीन देशमुख, किरण सोनवणे, सूर्यकांत म्हसकर, राकेश टेमघरे, सनी टेमघरे, राम जाधव, कुणाल कुरघोडे, राकेश भगत , महिला आघाडी रेवती सकपाळ, अनिता कांडारकर, प्रमिला कुरघोडे, अर्चना कुलकर्णी तसेच महिला आघाडी पदाधिकारी, पनवेलकर नागरिक, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.