तीन वर्षाच्या मुलासह आई बेपत्ता...
      तीन वर्षाच्या मुलासह आई बेपत्ता...
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः तीन वर्षाच्या मुलासह आई बेपत्ता झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील खैरणे गावात घडली असून याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जयंती सोमनाथ हलदार (25 रा.खैरणे) व तिचा तीन वर्षीय मुलगा वरुण हे दोघे राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेले आहेत. जयंती हलदार हिची उंची 5 फुट, बांधा सडपातळ, डोळे काळे असून अंगात गुलाबी साडी, पायात चप्पल व तिला बंगाली भाषा अवगत आहे. तसेच मुलगा वरुण हा रंगाने सावळा आहे. या दोघांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे 27452444 किंवा पो.हवा.आण्णासाहेब हसबे मो.नं.9867136876 यांच्याशी संपर्क साधावा.


फोटो ः जयंती व मुलगा वरुण
Comments