शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवा नोडमध्ये शिवसृष्टी उभारणार - लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल (लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरी) शिवाजी पार्क व आझाद मैदान हे राज्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील अत्यंत महत्वाची अशी स्थान आहेत. या दोन्ही स्थळांना अनन्य साधारण महत्व आहे. असेच राज्यातील आणखी एक महत्वाचे स्थान पनवेल उरणसाठी उलवा नोडमध्ये व्हावे, यासाठी या ठिकाणी शिवाजी पार्कच्या धर्तीवर मैदान आणि शिवसृष्टी उभारणार असल्याची ग्वाही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. २३) उलवा नोड येथे 'नमो चषक २०२५' भव्य क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी केले. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक २३ ते २५ जानेवारीपर्यंत उलवा नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या पाठीमागील बाजूच्या मैदानावर अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या या नमो चषकचे ढोलताशा लेझीम, फटाक्यांची आतषबाजी आणि हजारो खेळाडू आणि क्रीडा रसिकांच्या साक्षीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या शानदार उद्घाटन हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या ठिकाणी असलेल्या अटल सेतूवरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट दर्शन होईल, त्या अनुषंगाने महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, नमो चषकाचे मुख्य आयोजक व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, दीपक अहुजा, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, तालुका क्रीडा अधिकारी मानकर, तालुका गटशिक्षण अधिकारी सिताराम मोहिते, उरण गटशिक्षण अधिकारी प्रियंका पाटील, शिक्षण अभियंता अभिजित मटकर, खारघर अध्यक्ष प्रविण पाटील, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, अमरीश मोकल, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, जीवन गावंड, कामगार नेते सुरेश पाटील, सुधीर घरत, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, तालुका अध्यक्षा कमला देशेकर, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, ऍड. मनोज भुजबळ, विकास घरत, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, नीता माळी, वर्षा नाईक, वृषाली वाघमारे, मोनिका महानवर, न्हावे सरपंच विजेंद्र पाटील, विश्वनाथ कोळी, जयवंत देशमुख, डॉ. संतोष आगलावे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, उलवे नोड अध्यक्ष अमर म्हात्रे, उलवे १ अध्यक्ष निलेश खारकर, उलवे २ अध्यक्ष विजय घरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक, दिनेश खानावकर, योगिता भगत, सुधीर ठाकूर, धीरज ओवळेकर, तेजस जाधव, वितेश म्हात्रे, गौरव नाईक, गौरव कांडपिळे, नितेश पाटील, यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या नमो चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव प्रत्येकाच्या मनाला आनंद देणारा आहे. हि स्पर्धा अतिशय मेहनत घेऊन होत आहे. २०१७-१८ सालापासून या मैदानावर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य अश्वारूढ पुतळा उभारणी आणि विविध कार्यक्रमे, सभा व इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मैदान व्हावे, यासाठी सतत पाठपुरावा आम्ही करत आलो आहोत. २६ जानेवारी २०२० रोजी गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मुंबईच्या शिवाजी पार्क सारखे एक मैदान उलवे नोड मध्ये तसेच माझ्या म्हणजेच रामशेठ ठाकूर यांच्या नावाने हे मैदान निर्माण व्हावे असा प्रस्ताव काँग्रेस नेते महेंद्र घरत यांनी मांडला आणि त्याला ग्रामस्थांनी अनुमोदन दिले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयासाठी व मैदानासाठी सिडकोने जमीन देण्याचे कबूल केले आहे. या जमीनीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी जो काही खर्च येईल तो मी करायला सहमती दिली आहे. आणि या सर्व कामासाठी २५ ते ३० कोटी रुपये खर्च करण्याची तयारीही मी दर्शवली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नजीक उलवे नोड हा भाग सिडको विकसित करत आहे. अटल सेतूमुळे मुंबईच्या अगदी नजीक आली आहे. या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्याची संकल्पना गव्हाण आणि उलवे विभागातील नागरिकांनी मांडली आहे. या स्मारकासाठी सिडकोकडे जमीन मागितली होती. ती जमीन सिडको देण्यास तयार झाली आहे. अश्वारूढ पुतळयासाठी साधारण एक एकर जमीन सिडकोने राखीव ठेवली आहे तर मैदानासाठी ५ एकरचा भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून १५ हजार रुपये एकरी या भावाने सिडकोने त्यावेळी जमीन खरेदी केली आहे. मात्र आता त्याच एकरसाठी जवळपास ५ कोटींच्यावर रक्कम भरण्यास सिडकोकडून सांगण्यात येत आहे.सामाजिक कार्यासाठी संस्था संघटनांना नाममात्र शुल्कात भूखंड सिडकोकडून दिले जाते. त्याच धर्तीवर ही जमीन सामाजिक कार्यासाठी नाममात्र दरात मिळावी. खरेतर प्रकल्पग्रस्त उभारत असलेल्या प्रकल्पाला सिडकोने जमीन मोफत द्यायला हवी. या बाबतीत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. भूमिपुत्रांकडून उभारण्यात येणाऱ्या या शिवसृष्टीला ते सहकार्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत या ठिकाणी शिवाजी पार्क प्रमाणे आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि त्या अनुषंगाने शिवसृष्टी तसेच मुलांना खेळण्यासाठी प्ले गार्डन, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगुळा केंद्र, संमेलने, क्रीडा स्पर्धा, राजकीय सभा, सांस्कृतिक महोत्सव व अन्य कार्यक्रमांसाठी उभारण्यात येणारे हे भव्य मैदान नागरिकांना खूप फायदेशीर ठरणार आहे. यासाठी मी खर्च करणार असलो तरी यावर सर्वांचा हक्क राहील आणि या सर्व वास्तूंचा ताबा अधिकार गव्हाण ग्रामपंचायतीकडे राहील, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी अधोरेखित केले. कोट-
लोकनेते रामशेठ ठाकूर हे मनाने मोठे असलेले नेते आहेत. त्यांच्या रूपाने व्हिजन असलेला नेता आपल्या सर्वाना मिळाला आहे. लोकांसाठी काम करणारा आत्मा त्यांच्याकडे आहे. या ठिकाणी सुंदर क्रीडानगरी या स्पर्धेच्या निमिताने निर्माण झाली आहे. अटल करंडक, नमो चषक, उत्सव तसेच इतर पंतप्रधानांच्या सन्मानार्थ कार्यक्रमे सातत्याने आयोजित करून स्फूर्ती निर्माण करत असतात. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांच्याकडून या बाबी शिकण्यासारख्या आहेत. मी अनेक कार्यक्रमांना गेलो आहे पण भव्य दिव्य आयोजन काय असते ते या महोत्सवातून दिसत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळ आणि खेळाडूंची विशेष काळजी घेण्यात आली आहे. दोनवेळा नाश्ता आणि दोन्हीवेळा जेवण देण्याबरोबरच इतर सुविधाही खेळाडूंना या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि हे खेळाडूंच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असे आहे. अटल सेतूवरून येता-जाताना शिवसृष्टीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होणार आहे. ज्या ठिकाणी रामशेठ ठाकूर त्या ठिकाणी यश आणि त्यामुळे त्यांच्या शब्दावर लाखो मते आहेत. - बाळासाहेब पाटील, माजी सभापती-कोकण म्हाडा
चौकट-
या क्रीडा महोत्सवात राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, खो-खो, कबड्डी तसेच धावणे, भाला फेक, थाळी फेक, गोळा फेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडा फेक या अॅथलेटीक्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत सात हजारपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग नोंदीत झाला आहे. राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील एकूण विजेत्यांना ०७ लाख ५६ हजार रुपये, खो-खो मधील एकूण विजेत्यांना ०१ लाख ४३२०० रुपये, कबड्डी स्पर्धेतील मधील एकूण विजेत्यांना ०१ लाख ८१ हजार रुपये तर अॅथलेटीक्स स्पर्धेतील एकूण विजेत्यांना ०४ लाख ११ हजार रुपये अशी एकूण तब्बल १४ लाख ९१ हजार २०० रुपयांची रक्कम आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विजेत्या खेळाडूंना भरघोस रक्कमेची बक्षिसे आणि विनामूल्य प्रवेश या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्टय आहे.