केमोथेरपी ट्रिटमेंटसाठी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत...
पनवेल वैभव वृत्तसेवा :-
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत विस्टा फूड्स च्या सी एस आर फंडाद्वारे पनवेल परिसरातील कॅन्सर रुग्णांना कमीत कमी खर्चात केमोथेरपी ची ट्रिटमेंट मिळण्यासाठी डॉ. सलिल पाटकर यांच्या इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर चे Affordable Chemotherapy Center ला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
या प्रसंगी विस्टा फूड चे मार्गदर्शक सल्लागार चंद्रशेखर सोमण यांनी मार्गदर्शन करताना त्यांनी अनेक वर्षे, अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली असून यापूर्वी मागील वर्षी १९० कॅन्सर रुग्णांना याचा फायदा या सेंटर द्वारे करून दिला या प्रामाणिक आरोग्य सेवेबाबत डॉ. सलिल पाटकर यांचे कौतुक करून आमच्या सी एस आर ची योग्य ठिकाणी उपयोग वापर होत असल्याचे समाधान व्यक्त केले व ५ लाखाचा चेक पुढील सेवेसाठी सुपूर्द केला. रोटरी प्रांत ३१३१चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांनी मार्गदर्शन करताना रोटरी च्या माध्यमातून विविध प्रकल्पांना विस्टा फूड तर्फे मदत केली जाते व त्याचा विनियोग योग्य प्रकारे कसा केला जातो हे सांगितले तसेच चंद्रशेखर सोमण यांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी डॉ. सलिल पाटकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दीपक गडगे, माजी अध्यक्ष डॉ. आमोद दिवेकर, डॉ. लक्ष्मण आवटे, संतोष घोडिंदे, पुढील नियोजित अध्यक्ष अनिल ठकेकर, डॉ. सुरेश मोरे, डॉ. मिलिंद घरत, योगेश महाजन, ऍड. पूर्णिमा राऊत यांचे सह अँनस् वृषाली पोटे, ज्योती गडगे, निशिगंधा पाटील, सारिका ठकेकर आदि मान्यवर उपस्थित होते.