शहरी भागात होणाऱ्या घनकचरा स्थानांतर प्रकल्पा संदर्भात जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट...
शहरी भागात होणाऱ्या घनकचरा स्थानांतर प्रकल्पा संदर्भात जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट...
पनवेल ता.28( बातमीदार) आपल्या पनवेल महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील घनकचरा ही समस्या देखील जटिल बनत चालले आहे. त्या अनुषंगाने शहरात जमा होणारा कचरा घोट तलोजा कचरा डेपोपर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने वाहतूक करण्यासाठी पनवेल व कळंबोली या दोन ठिकाणी कचरा स्थानांतर केंद्र उभारण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरी भागात होणाऱ्या घनकचरा स्थानांतर प्रकल्पा संदर्भात जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट घेतली. या वेळी सदर प्रकल्प हे नागरी वस्तीत असल्यामुळे प्रकल्प केंद्राजवळील नागरीवस्तीला या प्रकल्पाचा त्रास होऊ नये. तसेच केंद्रातून दुर्गंधी येऊन परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, कचरा स्थानांतर केंद्रामुळे अस्वच्छता व आरोग्याचा कोणत्याही प्रश्न निर्माण होवू नये, अशी अपेक्षा शेवाळे यांनी आयुक्ताकडे व्यक्त केली. ज्या परिसरामध्ये हे केंद्र होणार आहेत, त्या परिसरामधील नागरिकांना विश्वासात घेऊन या प्रकल्पासंदर्भात प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देऊन हा प्रकल्प पालिका व नागरिकांच्या हिताचा कसा आहे, हे समजून सांगण्याच्या सुचना या वेळी आयुक्तांना केल्या.

कोट
शहरी भागात होणाऱ्या घनकचरा स्थानांतर प्रकल्पा संदर्भात आयुक्तांची भेट घेतली असून या प्रकल्पामुळे शहरातील नागरिकांना कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचे सांगितले आहे.
रामदास शेवाळे,
शिवसेना जिल्हाप्रमुख पनवेल.
Comments