शिवसेना पनवेल(उद्धव बाळासाहेब ठाकरे)शहर शाखेतर्फे अग्निशमन जवानांचा विशेष सत्कार..
पनवेल वैभव वृत्तसेवा : -
जय भारत नाका पनवेल येथील आदित्य श्री देवदानस या इमारती मध्ये वीज वहिनीच्या मीटर बॉक्समध्ये शॉटसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली असताना त्यावेळी ११ जण आगीत अडकले होते. यावेळी पनवेल अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली व त्यांचे संरक्षण केले. त्यांच्या या कर्तव्यदक्ष व तत्परते केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांबद्दल अग्निशमन दलाच्या जवानांचा पनवेल शहर शिवसेना शाखेतर्फे यथोचित सत्कार करून गौरविण्यात आले.
यावेळी प्रविण जाधव शहर प्रमुख, अच्युत मनोरे उपमहानगर प्रमुख, पराग मोहिते युवासेना जिल्हा प्रमुख, राकेश टेमघरे शहर संघटक, सन्नी टेमघरे उपशहर प्रमुख, जुनैद पवार विभाग प्रमुख, अमित माळी विभाग प्रमुख, साई सुरज पवार युवासेना, प्रमिला कुरघोडे तालुका संघटक, अर्चना कुलकर्णी शहर संघटक, उज्वला गावडे उपशहर संघटक, आस्विनी देसाई विभाग संघटक,त्रिवेदी मॅडम उपविभाग संघटक, ग्राहक कक्षाचे कुणाल कुरघोडे तसेच अग्निशमन दलाचे श्री बोडखे ,श्री सूर्यवंशी, अग्निशमन दलाचे जवान आदी उपस्थित होते.