वार्षिक क्रीडा स्पर्धांचे प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन...
वार्षिक क्रीडा स्पर्धांचे प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल वैभव वृत्त  - : महात्मा ज्योतिबा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यांनी उपस्थित स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
      जेव्हा आपण शिकलेल्या महाविद्यालयात आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानाने बोलवले जाते आणि आपण तिथे घडणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो ही गोष्ट माझ्यासारख्या माजी विद्यार्थ्याला अभिमानाची वाटते. शिक्षकांनी दिलेली शिकवण आज नक्कीच सार्थकी लागली यात मला शंका नाही. असे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.
   यावेळी प्रितम म्हात्रे यांच्यासोबत गणेश ठाकूर (प्राचार्य),  राजाराम पाटील (उपप्राचार्य), नरेश मढवी  (मा. उपप्राचार्य),  नामदेव पवार (उपप्राचार्य विज्ञान),  अनंता जाधव,  प्रफुल्ल वशेणीकर,  यशवंत उलवेकर,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Comments