शिवसेना शाखा देवद तर्फे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन...
          मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन..
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः शिवसेना शाखा देवद तर्फे स्व. मा. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर आयोजन जयंत पाखरे उपविभाग प्रमुख यांनी केले.  
रायगड संपर्क प्रमुख प्रसाद भोईर,विभाग प्रमुख विशाल भोईर, उपविभाग प्रमुख जयंत पाखरे यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले शिबिरात समाजातील गरजू लोकांना उपचाराचे दर परवडत नसल्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजित  करण्यात आले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात. यासाठी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करने गरजेचे आहे. शिबिरात 229 जणांनी लाभ घेतला. 
रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर,तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे,देवद विभाग प्रमुख विशाल भोईर उप विभाग प्रमुख जयंत पाखरे, उप शाखा प्रमुख मनोहर भोईर, हेमंत म्हात्रे, भिकाजी चव्हाण, संजय घाणेकर, ऋतिक टावरी, सिद्धेश चव्हाण, विठ्ठल शिगम, विजय जोगले, बिपिन झुरे, अनिल फाठक, योगेंद्र यादव, अर्जुन व्हटकर, तनुजा झुरे,रूहीता कांबळे, ऋतुजा हिर्लेकर, श्रद्धा वायंगणकर, मानसी कदम, उज्वला कांबळे, तनुश्री हिर्लेकर, संजना माने डॉ. शीतल माहुरे. डॉ. पंकज लोखंडे, फिजो थेरपी, डॉ. किरण जाधव, दिर्घाऊ क्लिनि, सूरज जाधव, अपोलो हॉस्पिटलचे डॉ. सुशील प्रसाद,  शंकरा आय हॉस्पिटलचे आर झुनझुनवाला, मोरया डेंटल क्लिनिक चे डॉ. आशिष बांदेकर यांच्या सहकार्याने शिबिर पार पडले.


फोटो ः शिवसेना आरोग्य शिबीर
Comments