पनवेल शहर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती सदस्य व पोलीस पाटील मेळावा...
पनवेल वैभव, दि.7 (संजय कदम) ः पोलीस रेझिंग डे सप्ताह अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाणे येथे महिला दक्षता कमिटी सदस्य व पोलीस पाटील यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वपोनि नितीन ठाकरे यांनी विविध विषयावर चर्चा तसेच मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना वपोनि नितीन ठाकरे यांनी पोलीस स्थापना दिनाची माहिती सांगून पोलीस ठाणेतील विविध कामकाजची माहिती दिली. तसेच पोलीस हे जनतेचे सेवक असून मदतीची आवश्यकता भासल्यास तात्काळ 112 वर संपर्क करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे सायबर फ्रॉड पासून कसे सावधान रहावे बाबत माहिती दिली. व नवी मुंबई पोलीस व्हाट्सअप चॅनल व यु ट्युब चॅनल बाबत माहिती दिली. मोबाईल फोन अति जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे होणारे दुष्परिणाम या बाबत माहिती दिली त्यांनी दिली.यावेळी पो.नि.पठाण व पो.नि.अभंग यांच्यासह 30 ते 35 सदस्य व गोपनीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
फोटो ः महिला दक्षता समिती सदस्य व पोलीस पाटील मेळावा