केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नदान...

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा...


पनवेल/प्रतिनिधी  - : 
भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणारा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा केदार भगत यांचा वाढदिवस 600 आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नदान करून साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त केदार भगत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले.याप्रसंगी भाजप नेते वाय.टी.देशमुख, टीआयपीलचे संचालक अमोघ ठाकूर यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना लोकनेते मा.खा.रामशेठ ठाकूर म्हणाले की,केदार हा धडाडीचा आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे.अतिशय मेहनतीने,जिद्दीने ते पक्ष कार्य करत असतात.त्यांनी हे कार्य असेच सुरू ठेवावे असे सांगून त्यांनी भगत यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यानंतर चिखले येथील आदिवासी आश्रम शाळेत 600 विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले.त्या विद्यार्थ्यांसोबत केक कापून त्यांच्यासोबत भोजन देखील केदार भगत यांनी केले.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद दिसून आला. यामुळे केदार भगत यांनी समाधान मिळाल्याचे सांगितले.
यावेळी विशाल सावंत,सुमित दसवते, फिरोझ शेख, राजेंद्र भगत,नितेश भगत,रवी पारचे, संतोष वर्तले,चिन्मय भगत, चेतन म्हसकर,यज्ञेश पाटील,ब्रिजेश बहिरा, जयदीप भगत, संकेत दसवते, अभिषेक भालेकर, निहाल पाटील, शेषनाथ गायकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक विष्णू गायकर आदी उपस्थित होते.
Comments