TIPL रोटरी प्रीमियर लीग स्पर्धेच्या ४थ्या पर्वास दिमाखदार प्रारंभ
पनवेल : TIPL रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 3131 मधील क्रिकेट प्रेमी रोटरी सदस्यांसाठी पनवेल परिसरात आयोजित करण्यात येणारी क्रिकेट स्पर्धा असून हे ४थे वर्ष आहे. शुक्रवार दि.१० जानेवारी २५ रोजी या स्पर्धेचे उद्घाटन माजी सभागृह नेते TIPL चे संचालक मा. परेश शेठ ठाकूर यांचे हस्ते माझगाव क्रिकेट क्लब कळंबोली येथील मैदानात करण्यात आले या प्रसंगी IFCR इंडिया चे अध्यक्ष डोंबिवली रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष मिलिंद मोहिते, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे अध्यक्ष , रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी चे अध्यक्ष रोहीत जाधव, IFCR DIST.३१३१चे डॉ. आमोद दिवेकर , BKC संघाचे संघमालक भाऊ कोकणे, कर्णधार अविनाश बारणे यांचे सह अनेक मान्यवर रोटरी सदस्य, रोटरी खेळाडू उपस्थित होते. आज पहिला सामना बाश्रि संघ व बीकेसी संघात खेळवला गेला त्याची नाणेफेक मा. परेश शेठ ठाकुर यांचे हस्ते करण्यात आली.
ही स्पर्धा १०,११,१२ जानेवारी व १७,१८,१९ जानेवारी २०२५ या दिवशी खेळवली जाणार आहे. रायगड रोटरी वॉरियर्स हे या स्पर्धेचे आयोजक असून या स्पर्धेत रोटरी 3131प्रांतातील ४० वर्षावरील ७८ रोटरी सदस्य खेळाडू म्हणून सहभागी झाले आहेत ते ७८ सदस्य सहा विविध संघात प्रत्येकी १३ खेळाडू IPL धर्तीवर लिलाव ( पैश्यांचा ऐवजी पॉईंट्स) पद्धतीने निवडले गेले आहेत.