चंद्रशेखर सोमण यांना मातृशोक...
चंद्रशेखर सोमण यांना मातृशोक...


पनवेल :-  
शिवसेनेचे स्थानिक नेते, ज्येष्ठ शिवसैनिक तथा पोलीस मित्र चंद्रशेखर सोमण यांच्या मातोश्री व शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांच्या आजी माधुरी यशवंत सोमण (वय ८१) यांचे शनिवार दि ८ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने महाड येथे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलं, दोन मुली, सहा नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. वयाच्या ७५ वर्षा पर्यंत प्रामाणिक रुग्णसेवा करणाऱ्या माधुरी सोमण यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली व सोमण कुटुंबीयांविषयी संवेदना व्यक्त केल्या. 

दशक्रिया विधी सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी पार पडेल असे कुटुंबीयांकडून कळवण्यात आले.
Comments