विविध गुन्ह्यातील २५ जप्त वाहनांचा पनवेल शहर पोलीस करणार जाहीर लिलाव...
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलीस ठाणे येथे विविध गुन्हयांमध्ये एकूण 25 वाहने जप्त करण्यात आलेली असून सदर वाहनांचे मुळ मालकांचा शोध घेतला परंतु ते मिळून येत नाहीत. सदरच्या गाडया बर्याच कालावधीपासून पोलीस ठाणे आवारात पडून आहेत. त्यांचे मुळ मालक मिळून येत नसल्याने प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया केली जाणार आहे.
तत्पुर्वी वरील नमुद वाहनांबाबत आजपर्यंत कोणीही सदर वाहनांचे मालकीबाबत दावा दाखल केलेला नाही. मा. प्रादेशिक परिवहन अधिकारी कळंबोली यांचेकडे उपलब्ध वाहनांचे आरटीओ रजि.नंबर, इंजिन नंबर, चेसीज नंबरची पडताळणी केली असता सदर वाहनांचे मालक मिळून आले नाहीत.
सदर गुन्हयातील जप्त वाहने ही भंगारात क्रश करून त्याचा लिलाव करण्याची मा. न्यायालयाने परवानगी दिली असून सदर वाहनांचा दिनांक 18/02/2025 रोजी 11.00 वा. रोजी पनवेल शहर पोलीस ठाणे आवारात लिलाव करण्यात येणार असून त्यासाठी इच्छुकांनी तत्पुर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे दुरध्वनी क. 8591424350 वर संपर्क साधावा, असे आवाहन वपोनि नितीन ठाकरे यांनी केले आहे.
फोटो ः जप्त वाहने