नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा - वपोनि गजानन घाडगे
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत परदेशी तसेच बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करुन राहत असल्याचे निदर्शनास आल्यास सुजाण नागरिकांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे मध्ये तात्काळ समक्ष येऊन अथवा फोन द्वारे माहिती द्यावी, असे आवाहन ‘पनवेल तालुका पोलीस ठाणे’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे केले आहे.
पनवेल महापालिका हद्दीत विना परवानगी भरवल्या जाणार्या विविध आठवडे बाजारांमध्ये बांग्लादेशी नागरिक व्यवसाय करत असून, अवैध आठवडी बाजारांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा अधिवेशनात केली होती. दरम्यान, अनधिकृत बांग्लादेशी नागरिकांचा विषय अधिवेशनात उपस्थित झाल्यावर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईतील सर्वच पोलीस ठाणे प्रशासनांना बेकायदेशीर बांग्लादेशी नागरिकांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशाची दखल घेत पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत परदेशी तसेच बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करुन राहत असल्याचे निदर्शनास आल्यास अथवा सदर व्यक्ती विषयी संशय आल्यास जागृत नागरिकांनी तात्काळ पनवेल तालुका पोलीस ठाणे मध्ये समक्ष येऊन अथवा फोन द्वारे माहिती द्यावी, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी स्पष्ट केले आहे.
फोटो ः गजानन घाडगे